Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअंधेरीमध्ये व्हिडिओ कॉलवरून तरुणीसमोर अश्लिल चाळे

अंधेरीमध्ये व्हिडिओ कॉलवरून तरुणीसमोर अश्लिल चाळे

whatsaap video call

मुंबई : टॅक्सी,रेल्वेमध्ये तरुणींसमोर अश्लिल चाळे केल्याचे प्रकार पूर्वी घडले आहेत. आता तरुणीला चक्क व्हिडिओ कॉल करून तिच्यासमोर अश्लिल चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. ही घटना अंधेरीमध्ये घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकारानंतर आरोपीला फरार झालेल्या आरोपीला हिंगोलीमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. सुधाकर कासिद असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सुधाकर कासिदनं डिसेंबर २०१९ मध्ये अंधेरीत राहणाऱ्या एका तरुणीच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केला. त्यानं त्याआधी व्हाइस कॉल केला होता. पण त्यानं तो कट केला होता. त्यानंतर काही वेळानं त्यानं व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्यानं तिच्यासमोर अश्लिल चाळे केले. या व्हिडिओत त्याचा चेहरा दिसत नव्हता. या प्रकरणी तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणाला व्हिडिओ कॉल केल्यानंतर सुधाकर कासिदनं कॉल करण्यासाठी वापरलेला सिम कार्ड तोडून फेकून दिला आणि त्यानंतर त्यानं मुंबईतून पलायन केलं. कासिद हा मुंबईमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करत होता. पोलिसांनी आरोपीचा त्याच्या मोबाइल फोनच्या आयएमईआय क्रमांकाच्या मदतीनं ठावठिकाणा शोधला. त्यानंतर त्याला हिंगोलीतून ताब्यात घेण्यात आलं.

व्हिडिओ कॉलवरून अश्लिल चाळे, विचित्र आवाज….

माझ्या मोबाइलवर एक व्हाइस कॉल आला. मी फोन उचले पर्यंत समोरून कॉल कापला केला. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉल करणारी व्यक्ती अश्लिल चाळे करत होता. त्याचा चेहरा दिसत नव्हता. तो अश्लिल चाळे करतानाच विचित्र आवाजही काढत होता,’ अशी माहिती पीडित तरुणीनं दिली.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments