Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपापाचा घडा भरला!

पापाचा घडा भरला!

देशात स्वयंघोषित बुवा,बाबांची काही कमतरता नाही. त्यापैकीच एकमेव स्वयंघोषित आसारामला अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात जोधपूर न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खरतर या निर्णयामुळे आसारामच्या आंधळ्या भक्तांसाठी आजचा दिवस खूप वाईट होता. ती पीडित अल्पवयीन मुलीसाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक होता. १५ ऑगस्ट २०१३ ला गुरुकुल आश्रमात शिकणारी ती पीडिता सारख्या असंख्य मुली, महिलांवर अत्याचार करणाऱ्या आसारामला त्याच्या कर्माची फळ मिळाली. नेहमीच महिलांच्या गराड्यात वावरणारा. ऐशोआरामत वावरणाऱ्या आसारामचं संपूर्ण आयुष्य आता तुरुंगात जाणार आहे. खरतर आपल्या देशात अंधभक्तांची कमतरता नाही. आसारामला दोषी ठरवून सुध्दा त्याचे भक्त ‘आसाराम निर्दोष’ आहेत. एवढ्यावरच हे भक्त थांबले नाही तर, त्याच्यासाठी आश्रू ढाळणारी ही मंडळी होती. जे स्वत:च्या आई वडिलांची घरातील ज्येष्ठांचा जेवढा आदर करत नाही तेवढी श्रध्दा ढोंगी, बाबा, बुबांवर टाकतात. हिच खरी अंधश्रध्दा आहे. ज्यावेळी अंधश्रध्देच्या विरोधात काम करणारी मंडळी बुवा,बाबां बद्दल काही शब्दही काढला तर त्यांना धर्मविरोधात काम करतात. असा आरोप करुन ढोंगी बुवा बाबांच्या पाठराखे तथाकथीत ढोंगी राजकारणी, संघटनांची मंडळी टीका करण्यासाठी पुढाकार घेतात. हे मातब्बर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, नरेंद्र मोदी, राजनाथसिंग, वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान, मोहन भागवत, कमलसिंह, दिग्विजयसिंह, यांच्या सारखे नेतेही आसारामच्या चरणी जाऊन गोडवे गायलेले आहेत. विशेष म्हणजे आसारामचे सर्वात जास्त राजकीय भक्त भाजप,संघाचेच होते. राजकीय पाठबळामुळे आसारामने कोट्यवधीची माया जमवली. हजारो कोटयवधी रुपयांच्या जमिनी आश्रमाच्या नावावर हडपल्या. त्या जमीनी सरकार परत घेणार का? ज्यांनी लाडपुरवले तेच आसारामचे भक्त असल्यामुळे ते सत्तेत असल्यामुळे जमीनी परत घेण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. जमीनी परत घेण्यासाठी कुणालाही न्यायालयात धाव घेऊन मागणी केल्याशिवाय सरकार कामाला लागणार नाही. शेवटी गुन्हेगारांना पाठिशी घालणारं सरकार सत्तेत असल्यामुळे चित भी मेरी पट भी मेरी, अशी परिस्थिती असल्यामुळे कृपादृष्टी लाभू शकते. खरतर आसारामने आश्रमात अनेक महिला,मुलींवर अत्याचार केलेले आहेत. समाजात बदनामी होऊ नये किंवा आसारामच्या भीतीने त्यांनी अत्याचाराची वाच्याता फोडली नाही. अत्याचारा बरोबर हत्यांचे प्रकारही बरेच झाले आहेत. मात्र ते उलगडले नाहीत. राजकीय शक्ती पाठिशी असल्यामुळे ती प्रकरण दाबले जात होते. जो आसारामच्या विरोधात आवाज काढत होता त्याचा खून करण्यात येत होता. अशी कित्येक प्रकरण बाहेरही आले नाहीत. बऱ्याच आश्रमात खून करुन ते जमीनीत गाडण्यात आले आहेत. आसारामला शिक्षा सुनावल्या नंतर त्याच्या बऱ्याच आश्रमाच्या पाट्यांची तोडफोड करण्यात आली. भोपालमध्ये तर भोपाल नगर पालिकेचे नगराध्यक्ष आलोक शर्मा यांनी स्वत:च्या हाताने आसाराम बस स्टॉपचे फलक उखडून फेकून दिले. जनतेचा तो आक्रोश होता. शेवटी हजारो कोट्यवधी रुपयाच्या जमिनी आश्रमाच्या नावाने हडप केल्यात त्याच काय? अजून गुजरातच्या दोन बहिणीवरील अत्याचाराची शिक्षा सुनावण्यात आली नाही. या व्यतीरिक्त खुनाचेही खटले प्रलंबित आहेत. आता आसाराम बाहेर येणार नाही. त्याच्या प्रवचनातून तो सांगत होता. तुम्ही कितीही देवाला स्मरण केले तरी शेवटी आयुष्यात रडावचं लागत आणि शेवटी आसारामच्या नशीबीही तेच आले आहेत.

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments