Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या ट्विटने खळबळ

आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या ट्विटने खळबळ

Ashish Shelar contacts Mantrika, tweet by NCP
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेनं सत्तावाटपावरून भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे नेते आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना दावा केला होता. आता ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या टि्वटर हॅंडलवरून शेलारांचा मात्रिकांसोबतचा फोटो टि्वट करण्यात आला आहे.

शेलार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी, “आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत. त्यांनी काहीतरी तंत्रमंत्र केलं असेल. अमूक एक अदृष्य शक्ती आहे वगैरे सांगितलं असेल. पण असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. आमच्या शक्ती आमच्या जवळ आहेत. आमच्या अंतर्मनातून आलेल्या शक्ती या प्रचंड एकनिष्ठ, बलवान आणि स्वत:च्या विचारबरोबर घेऊन जाणाऱ्या आहेत,” असं मत व्यक्त केलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेलार यांचा मांत्रिकाच्या वेशातील एका व्यक्तीबरोबरचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

शेलार यांच्याबरोबर उभ्या असणारी व्यक्तीने काळे कपडे परिधान केेलेले आहेत. या व्यक्तीच्या गळ्यामध्ये अनेक माळा असून हातात मोठ्या अंगठ्या असल्याचे दिसत आहे. हा फोटो म्हणजे आव्हाडांनी केलेल्या दाव्याचा पुरावा आहे असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, हा फोटो नक्की कोणाचा आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. राष्ट्रवादीच्या या टीकेला शेलार काय उत्तर देतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments