Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभारत बंद : मुंबईत मंगळवारी बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू...

भारत बंद : मुंबईत मंगळवारी बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू राहणार

मुंबई l कृषी कायदा रद्द करा या मागणीसाठी शेतक-यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आंहे. परंतु देशाची आर्थित राजधानी मुंबईमध्ये बेस्ट बस,टॅक्सी, रिक्षा नागरिकांच्या सेवेसाठी सुरु राहणार आहे. त्यामुळे भारत बंद असला तरी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे.

वीज पुरवठा सुरू राहील. दूध, भाजीपाला, पाणी पुरवठा या सेवा सुरू राहतील. देशात महामारी कायदा लागू आहे याचे भान ठेवून वैद्यकीय सेवा तसेच औषधांची दुकानं यांना त्यांच्या कामकाजात बंदचा कोणत्याही स्वरुपाचा अडथळा होणार नाही, असे संकेत राज्य सरकारने दिले आहेत.

कोरोना संकटामुळे शाळा आणि कॉलेज ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत आणि ते तसेच सुरू राहतील. यामुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरू राहू शकेल. बंद असल्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या प्रत्येक बसच्या सर्व काचांवर संरक्षक जाळ्या बसवून नंतर बस रस्त्यावर आणल्या जातील.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात चर्चांमधून तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता भारत बंदची हाक दिली आहे. ८ डिसेंबरला एक दिवसाचा देशव्यापी संप शेतकऱ्यांनी पुकारला आहे.

शेतकऱ्यांच्या संपाचा आज नववा दिवस आहे. मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावेत त्यात सुधारणा करु नये अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

देशातले शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांना अडवण्यात आलं असलं तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारने चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे.

मात्र आत्तापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत.त्यानंतर आता शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. असं असलं तरीही उद्या होणाऱ्या बैठकीला शेतकरी हजर राहणार आहेत.

कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे. मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत हीच आमची ठाम भूमिका आहे असं ऑल इंडिया किसान सभेचे कार्यकारी सचिव हनान मोलाह यांनी म्हटलं आहे.

आम्ही कालच सरकारला आमची मुख्य मागणी सांगितली आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, रद्द करण्यात यावेत ही आमची मुख्य मागणी आहे.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments