Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईHONEY TRAP : धनंजय मुंडे सेफ, रेणू शर्माच्या अडचणीत वाढ?

HONEY TRAP : धनंजय मुंडे सेफ, रेणू शर्माच्या अडचणीत वाढ?

मुंबई: रेणू शर्मा  प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असताना रेणू विरोधात हनीट्रॅप, ब्लॅकमेलींगच्या चार तक्रारी आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या आरोपांवरील सर्व हवाच निघून गेली. उलट रेणूच्या अडचणीत वाढणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. हे बैठकीत स्पष्ट झालं आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी रात्री झालेल्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक,खासदार सुप्रिया सुळे,गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

धनंजय मुंडे प्रकरणामुळे ही कोअर कमिटीची ही बैठक महत्त्वाची मानली गेली. रात्री दहा वाजेच्या आसपास या बैठकीला सुरूवात झाली. तर तासभराच्या चर्चेनंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास ही बैठक संपली.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची माहिती शरद पवार यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून घेतल्याचं सांगण्यात येतंय. विश्वास नांगरे पाटील हे शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर संध्याकाळच्या सुमारास दाखल झाले होते. यावेळी शरद पवार यांनी नांगरे पाटील यांच्याशी चर्चा केल्याचं बोललं जातंय.

बलात्काराच्या आरोपांनंतर विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

या भेटीत मुंडे यांनी शरद पवारांसमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडली. त्यापूर्वी मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नंतर छगन भुजबळांचीही भेट घेतली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माविरुद्ध चार तक्रारी दाखल झाल्या आहेत.

 धनंजय मुंडे, भाजपचे नेते कृष्णा हेडगे, मनसे नेते मनीष धुरी, रिझवान शेख यांनी ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात रेणू शर्माची बाजू कमकुवत पडताना दिसत आहे. त्यानंतर रेणू शर्मा यांनी आणखी काही लोकांना अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सगळ्याची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबायचा निर्णय घेतला आहे. परिणामी तूर्तास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments