Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईखुशखबर l ब्रिटनमध्ये कोरोना लशीला मंजुरी,पुढच्या आठवड्यात डोस देणार

खुशखबर l ब्रिटनमध्ये कोरोना लशीला मंजुरी,पुढच्या आठवड्यात डोस देणार

ब्रिटन : ब्रिटनने कोरोना व्हॅक्सिनला मंजुरी दिली असून असा करणारा तो युरोपातील पहिला देश बनला आहे. ब्रिटनने अमेरिकन फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएन्टेक यांच्या संयुक्त कोरोना लसीला बुधवारी मान्यता देण्यात आली. ख्रिसमसच्या आधी म्हणजेच पुढील आठवड्यात ब्रिटनच्या लोकांना लसीचे डोस देण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

जगभरात सध्या 212 लसींवर काम सुरू आहे. चीनने फेज-1 चाचणीपूर्वीच चार आणि रशियाने फेज-3 चाचणीपूर्वी दोन लसींना मंजुरी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये लसीकरण देखील सुरू झाले आहे. मात्र तीन फेजच्या चाचणीनंतर जगात आतापर्यंत एकाही लसीला मंजुरी मिळाली नव्हती. यामुळे फायझर ही जगातील पहिली लस असेल, जिला तीन चाचण्यानंतर एखाद्या सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.

फायझरची लस 95% प्रभावी असल्याचे सिद्ध 

फायझर आणि बायोनॉटॅकची संयुक्त कोरोना लस फेज 3 ची चाचणी 95% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले होते. बुधवारी मिळालेल्या मंजुरी पूर्वी UK च्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने म्हटले होते की, सुरक्षिततेशी तडजोड न करता ते शक्य तितक्या कमी कालावधीत फायझर लसीला मंजूरी दिली जाईल.

50 रूग्णालयात लसीकरण सुरू होईल

यूके सरकारने मंजुरी दिल्यानंतर म्हटले की, ते प्राधान्य गट ठरवतील आणि त्यानंतर लसीकरण सुरू करणार आहे. पहिला डोस ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. 8 लाख डोससोबत 50 रुग्णालयांतून लसीकरणाला सुरूवात होईल.

वाचा l मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’ मनसेचा योगींवर निशाणा

फायझरने अमेरिकेतही मंजुरीसाठी FDA मध्ये अर्ज केला आहे. आतापर्यंत फायझर-बायोएनटेक, मॉडर्ना, रशियाची स्पूतनिक V आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी-अॅस्ट्राजेनेकाच्या लसींचे तिसऱ्या टप्प्यातील परिणाम समोर आले आहेत. UK ने सात वेगवेगळ्या उत्पादकांकडून 40 कोटी लस खरेदी करण्यावर सहमती दर्शवली आहे.

सामान्यत: संशोधनापासून विकासासाठी आणि कोणत्याही लसीला मान्यता देण्यास 10 वर्षे लागतात. मात्र फायझर अशी पहिली लस असेल जी केवळ 10 महिन्यांत संकल्पनेतून वास्तविकतेमध्ये उतरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments