Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअंधेरीत पेट्रोलपंपावरील थरार, कर्मचा-यांवर गोळीबार

अंधेरीत पेट्रोलपंपावरील थरार, कर्मचा-यांवर गोळीबार

Representational Image

मुंबई: अंधेरी चकाला येथील पेट्रोलपंपावर बुधवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी भरदिवसा गोळीबार केल्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने या गोळीबारात कुणी जखमी झाले नाही.

चकाला येथील गुरुनानक पेट्रोलपंपावर बुधवारी पहाटे सुमारे चार वाजता दोन मास्क लावलेले तरुण दुचाकीवरून आले. त्यांनी येथील कर्मचाऱ्यांना बोलावले आणि कितीजण आहात असे विचारले. त्यावेळी कर्मचाऱ्याने तुम्हाला काय करायचे आहे आणि कोण आहेत तुम्ही? असे विचारताच दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने स्वतःकडून बंदुकीतून कर्मचाऱ्यांच्या दिशेने गोळी झाडली. हे पाहून कर्मचाऱ्यांनी पेट्रोलपंपावरील कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी बंदुकीतील गोळी येथील एका टेबलाला लागली. कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे मास्क घातलेले हे दोघे पळून गेले.

त्या गुंडांचा शोध सुरु…

मास्क लावून गोळ्या झाडणा-या गुंडांचा शोध पोलीस घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वर्णनांवरून अंधेरी पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असून, आरोपी पकडल्यानंतर बरीचं माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments