Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईजनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू : आ. बाळासाहेब थोरात

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू : आ. बाळासाहेब थोरात

मुंबई : राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण सर्व जण मिळून जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करू असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

आज दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक प्रेदशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तामिळनाडूचे प्रभारी संजय दत्त, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, आ. डॉ. विश्वजीत कदम, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, खा.बाळू धानोरकर, के. सी. पडवी किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव अमित देशमुख, वर्षा गायकवाड, संपतकुमार, सोनल पटेल, बी. एम. संदीप, चेला वामशी रेड्डी, विधीनपरिषदेतील काँग्रेस गटनेते शरद रणपिसे, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचीत आमदार उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याबद्दल नवनिर्वाचीत आमदारांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे व आ. बाळासाहेब थोरात यांनी नवनिर्वाचीत आमदारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांनी परिश्रम घेऊन या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आमदार म्हणून आपल्या सर्वांची आहे. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

राज्यातील शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. परतीच्या पावसामुळे खरीप वाया गेले आहे. त्या शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आ. थोरात म्हणाले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही नवनिर्वाचीत आमदारांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments