Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमहाराष्ट्र विकास आघाडीची शनिवारी बहुमत चाचणी

महाराष्ट्र विकास आघाडीची शनिवारी बहुमत चाचणी

uddhav thackeray will take oath as cm shivaji parkमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची उद्या शनिवारी बहुमत चाचणी होणार आहे. सरकारकडे बहुमतापेक्षा जास्त 170 आमदारांचा सरकारला पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार या चाचणीत पास होणार आहे. असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विधानसभेचं दोन दिवसांचं हंगामी अधिवेशन उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन पदाचा कार्यभार स्वीकारला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाआघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, उद्धव ठाकरेंचं सरकार उद्या बहुमत सिद्ध करणार आहे. सरकारकडे १६२ आमदारांचा पाठिंबा होता, आता हा आकडा १७० वर पोहोचला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments