Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुख्यमंत्री फडणवीस –केंद्रीय मंत्री इराणी यांच्यात बैठक

मुख्यमंत्री फडणवीस –केंद्रीय मंत्री इराणी यांच्यात बैठक

महिला - बालकल्याण क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामांबाबत केंद्रीय मंत्री इराणी यांच्याकडून प्रशंसोद्गार

मुंबई : महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे प्रशंसोद्गार केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी आज येथे काढले.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन महिला व बालकल्याण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रांच्या योजनांच्या बरोबरीने राज्याच्या यंत्रणेने ग्रामीण क्षेत्रासह नागरी भागात महिला व बालकल्याणातील कुपोषणमुक्ती आणि आरोग्याशी निगडित योजना आणखी सक्षमपणे राबवू असे सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कुपोषण मुक्ती आणि महिला आरोग्याच्या क्षेत्रात राज्यातील यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत यामुळे कुपोषण मुक्ती सह बालमृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे. केंद्राप्रमाणेच राज्याच्या यंत्रणेनेही नागरी भागात विशेषत्वाने काम करण्याची गरज आहे. नागरी भागात या योजना आणखी सक्षम राबविल्यास आणखी प्रभावी कामगिरी नोंदविता येईल.’

केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या, ‘महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. राज्यात कुपोषण मुक्ती, माता व बाल आरोग्य यात उत्कृष्टपणे काम सुरू आहे. ‘माँ’ या पोषण अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील असा विश्वास वाटतो. राज्यात या क्षेत्रात आस्थेवाईकपणे काम सुरू आहे. पायाभूत आणि सुविधांप्रमाणेच ही आस्था बदलाची गोष्ट मोठी महत्त्वाची बाब आहे.’

यावेळी स्मार्ट अंगणवाडी, माता-बाल लसीकरण, पोक्सो अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया व कार्यवाही, बाल मृत्युदर रोखण्यासाठीचे विविध उपाय योजना, जाणीव-जागृतीचे उपक्रम, प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी आधाराश्रमांची उभारणी आदी विषयांवर चर्चा झाली.

याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे केंद्रीय सचिव श्री. पवनार, प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त इंद्रा मालो, अजय खेरा आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments