Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई मनपाने फेरीवाल्यांच्या ४३०० हातगाड्यांवर जेसीबी फिरवले

मुंबई मनपाने फेरीवाल्यांच्या ४३०० हातगाड्यांवर जेसीबी फिरवले

BMC and hackersमुंबई : मुंबई महापालिकेने दोन आठवड्यात अनधिकृत फेरीवाल्यांच्या ४ हजार ३०० हातगाड्या जप्त केल्या होत्या. त्या हातगाड्या आज महापालिकेने जेसीबी मशीनद्वारे तोडून टाकल्या. विशेष म्हणजे मुंबईच्या २४ प्रभागांमध्ये कारवाई करत आली होती. त्यामुळे फेरीवाल्यांमध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे.

अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली होती कारवाई….

पूर्वी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या दंड भरल्यानंतर परत देण्यात येत होत्या. आता मात्र त्या नष्ट करण्यात येत आहेत. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये छोटे व्यवसाय करण्यासाठी चार चाकी हातगाड्यांचा वापर केला जातो. या हातगाड्यांमुळे नेहमीत वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतात. शिवाय नागरिकांची चालताना गैरसोय होत असते. तर, कधी अपघातही होतात. हेच लक्षात घेत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आपली कारवाई अधिक कठोर केली. या कारवाईअंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत मागील दोन आठवड्यांपर्यत सुमारे ४ हजार ३०० हातगाड्या महापालिकेने कारवाईअंतर्गत जप्त केल्या होत्या.

या भागात सर्वात जास्त कारवाईत केली होती….

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने १६ नोव्हेबरपासून अनधिकृत हातगाड्या जप्त करायला सुरुवात केली. या कारवाईत सर्वात जास्त ३१९ हातगाड्या अंधेरीमधून जप्त करण्यात आल्या. त्यानंतर कुर्ल्यामधून २५२, तर चेंबूरमधून २१२ हाजगाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.

फेरीवाले त्रस्त….

पोटाची खळगी भरण्यासाठी हातगाडीवर वस्तू विकणा-यांना कारवाईमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावत आहेत. कारण महापालिकेने कारवाईमध्ये गाड्या जप्त करुन त्या तोडून टाकल्यामुळे पुढे काय करायचे. पुन्हा गाडी कशी खरेदी करायची. गाडी खरेदी केल्यानंतर महापालिकेने कारवाई केली तर पुन्हा काय होणार असा प्रश्न सतावत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments