Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभिडे गुरुजींच्या विरोधकांना कोर्टाची चपराक

भिडे गुरुजींच्या विरोधकांना कोर्टाची चपराक

मुंबई: १६ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईत शिवडी येथे संभाजी भिडे गुरुजींच्या शिवचरित्र आणि सुवर्ण सिंहासनसंदर्भात व्याख्याना वेळी काही संघटनांनी भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. या व्याख्यानासाठी मुंबईतील धारकऱ्यांनी बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग कार्यालयातून रितसर पैसे भरून परवानगी घेण्यात आली होती. बंदिस्त सभागृहात व्याख्यान असल्याने पोलिसांनीही सहकार्य केले होते.

सदर व्याख्यान झाल्यानंतर तब्बल ८ महिन्यांनी ऑगस्ट २०१९ रोजी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी धारकऱ्यांना सांगितले की, “तुमच्या विरोधात भीम आर्मी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारत एकता मिशन यांनी तुम्ही भिडे गुरुजींचे जे व्याख्यान घेतले होते तेव्हा पोलिसांची परवानगी घेतली नाही असे तुमच्या विरोधकांचे मत आहे. तुमच्यावर गुन्हा नोंद झाला आहे तेव्हा न्यायालय जो फाईन सांगितील तो भरून टाका आणि विषय संपवा”. जे व्याख्यान कायदेशीर मार्गाने रितसर पैसे भरून घेतले होते त्याविरोधात कोणीतरी खोटी तक्रार केली म्हणून. भिडे गुरुजींचे धारकरी खोटा गुन्हा मान्य करतीलच कसे? कर नाही त्याला डर कशाला? या प्रकरणात दंड फक्त ५०० रुपये होता पण विषय दंड भरण्याचा नव्हता, विषय होता चुकीचा खोटा गुन्हा मान्य का करायचा? कोणासाठी?

भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी दंड भरण्यास नकार दिला. आम्ही तेव्हाही रितसर पैसे भरून बंदिस्त सभागृहात आदरणीय गुरुजींचे व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यानासंबधी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांना आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो असता त्यांनी निवेदन न घेता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बनसोड यांनी “ठीक आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करू!” असे सांगितले होते.

चुकीचा गुन्हा मान्य करायचा नाही असे धारकऱ्यांनी ठरवले आणि आपली सत्याची बाजू मांडण्यासाठी मुंबईत धारकऱ्यांसाठी सदैव धावून जाणाऱ्या अधिवक्ता दास यांना याबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यांनी ताबडतोब कोर्टात केस डिसमिस करण्यासाठी अपिल केले. न्यायाधीश धारकऱ्यांची न्यायाची बाजू मांडली. “त्या व्याख्यानाला रितसर पैसे भरून महानगर पालिकेची परवानगी घेतली होती. घटना घडली डिसेंबर २०१८ ला आज इतक्या दिवसानंतर त्याविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करून गुन्हा कसा काय नोंद होऊ शकतो?” असा युक्तिवाद करत न्यायाधीशांकडे न्यायाची मागणी केली. न्यायाधीशांनी सर्व बाजू तपासल्यानंतर आदरणीय भिडे गुरुजींच्या व्याख्यान विरोधातली केस फेटाळली आणि धारकऱ्यांना दिलासा दिला.विजय शेवटी सत्याचाच होतो. धर्माच्या न्यायाच्या बाजूने जो उभा राहतो विजय त्याचाच होतो. संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधात खोटे गुन्हे नोंद करणाऱ्या विरोधकांना या सगळ्या प्रकरणात न्यायालयाने मोठी चपराक दिली आहे!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments