Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपंकजा मुंडेंचा ‘या’ मुद्यावरून देवेंद्र फडणवीसांना चिमटा

पंकजा मुंडेंचा ‘या’ मुद्यावरून देवेंद्र फडणवीसांना चिमटा

pankaja munde devendra fadnavisमुंबई : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मी राहुल सावरकर नाही मी माफी मागणार नाही असे विधान केले होते. त्यानंतर भाजपकडून त्या विधानाचा जोरदार निषेध करण्यात आला. भाजपनेही अधिवेशनात या वक्तव्यावरून गोंधळ घातला. त्यानंतर या सावरकरांच्या मुद्यावर भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे. मात्र, त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाच चिमटे घेतले की स्वपक्षीयांनाच सुनावले आहे? असा प्रश्न चर्चेत आला आहे.

पंकजा मुंडे या पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस आणि पक्षाला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. विशेष म्हणजे १२ डिसेंबररोजी सुध्दा त्यांनी शारयरीतून फडणवीसांना टोला लगावला होता. सोमवारीही हिवाळी अधिवेशनात भाजप नेते सावरकारांच्या त्या विधानावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच सभागृहातही यावरून बराच गदारोळ झाला होता.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असतानाच सावरकरांचा मुद्दाही चर्चेत आहे. १९४७ पूर्वी या देशात तरुणांना स्वातंत्र्य हवं होतं. आता स्थैर्य हवं आहे. सावरकरांप्रमाणे आपण कधी संवेदनशील होऊन पुढील पिढीसाठी योगदान देणार? असा सवाल पंकजा यांनी केला आहे. मात्र, त्यांचा रोख कुणाच्या दिशेने आहे. याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

तरुणांना काय हवंय पंकज मुंडेचा ट्विट…

सावरकर वादावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे. “सागरा प्राण तळमळला” या देशात तरुणांना काय हवंय… १९४७ पूर्वी स्वातंत्र्य हवं होतं. आता स्थैर्य हवं आहे. महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीनं केल्याने होतोच. प्रचंड संतापही होतो… सर्वांना होतो. त्यांच्या नावाच्या राजकारणाने पिडाही होते. कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार? जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले..,” असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments