Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज ठाकरेंना झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा इशारा

राज ठाकरेंना झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा इशारा

Raj Thackeray - Purushottam Khedekarमुंबई : महाराष्ट्र नवर्निमाण सेना (मनसे) चा नवा झेंडा लाँच करण्यात आला. झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला. त्यामुळे मराठा संघटना, संभाजी ब्रिगेड या संघटना संतप्त झाल्या आहेत. मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी मनसेला इशारा दिला आहे.

राज ठाकरे तुमच्या कृतीचा विरोध रस्त्यावर दिसत नसला तरी अनेकांच्या मनात राग धुमसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते समोरासमोर नवल वाटू नये असाही इशारा पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिला आहे. मराठा सेवा संघ आणि मराठा संघटनांच्या वतीने राज ठाकरेंच्या या कृतीला कायदेशीररित्या विरोध करण्याचे आम्ही ठरवलं आहे. भविष्यात मनसे आणि संभाजी बिग्रेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील. असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळप्रसंगी मनसेविरुध्द आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केलं.

संभाजी बिग्रेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात पुणे येथे तक्रार दाखल केली आहे. मनसे विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा सेवा संघटनेते नेते व आर. आर. पाटील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे महाराष्ट्र नवर्निमाण सेना (मनसे) वादात अडकली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments