Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्ररामदास आठवले सरसंघचालक मोहन भागवतांवर संतापले

रामदास आठवले सरसंघचालक मोहन भागवतांवर संतापले

Ramdas Athawale Mohan Bhagwat,Ramdas, Athawale, Mohan, Bhagwatमुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी भारतातील १३० कोटी जनता हिंदूच आहे, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला. देशात राहणाऱ्या सर्वांना हिंदू म्हणणे योग्य नाही असा आक्षेप नोंदवला.

हैदराबाद येथे बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय विजय संकल्प शिबीरात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील १३० कोटी जनतेबाबत विधान केले होते. देशात राहणारी १३० कोटी जनता कोणत्याही धर्माची आणि संस्कृतीची असली तरी आरएसएस या सर्वांना हिंदूच मानत आला आहे. असं मोहन भागवत यांनी सांगितलं होतं.

मोहन भागवत यांच्या विधानाबाबत आठवले यांनी माध्यमांशी बोलताना आक्षेप नोंदवला. देशातील सर्व नागरिक हिंदू आहेत, असे म्हणणं योग्य ठरणार नाही. येथे एक काळ असा होता की, देशात सर्वच बौद्ध होते. आता हिंदुत्व येताच भारत हिंदूराष्ट्र म्हणवलं जाऊ लागलं आहे, असे नमूद करतानाच देशात राहणारे सगळेच आपले आहेत, असे भागवत यांना म्हणायचे असेल तर ती चांगली बाब आहे. त्याला हरकत असण्याचे कारण नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments