Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी

शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी

Pradeep Sharma
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी, शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला मतदान केंद्रावरच धमकी दिली. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांच्या तक्रारीवरून शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विरार पूर्व चंदनासार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. नालासोपारा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात शिवसेनेने प्रदीप शर्मा हे मैदानात होते. प्रचारादरम्यान शर्मा आणि ठाकूर गटात अनेकदा वाद बघायला मिळाले. मात्र, आता मतदान अधिकाऱ्यांशीही वाद केल्याने प्रदीप शर्मांवर अरेरावीचा आरोप होत आहे.

प्रदीप शर्मांवर हे आहेत आरोप…

मतदान केंद्रात जबरदस्ती प्रवेश करणे, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे असे गंभीर आरोप प्रदीप शर्मांवर आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर आयपीसी 186, 504, 506, लोकप्रतिनिधी कायदा कलम 131 (1)(2), 171 (ब) प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments