Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेना खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात

शिवसेना खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात

Sanjay Raut, Shiv Sena, Uddhav Thackeray bjpमुंबई: गेल्या पंधरा दिवसांपासून सत्तेच्या वाटपावरून शिवसेना संजय राऊतांची धावपळ सुरु होती. त्यामुळे आज अचानक छातीत वेदना होत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दोन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस संजय राऊत कुणालाही भेटणार नाहीत असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत निवडणूक निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून चर्चेत आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संजय राऊतांकडे निकाललागल्यापासून शिवसेनेच्या सर्व भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे दररोज संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडत होते. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments