Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोपीनाथ गडावर जाऊन घेणार दर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोपीनाथ गडावर जाऊन घेणार दर्शन

Gopinath munde , uddhav thackerayमुंबई : शिवसेना-भाजपात सत्तेच्या वाटपावरून पेच कायम असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीचे शिल्पकार भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत. त्यासाठी ठाकरे परळीमध्ये आज गोपीनाथ गडावर जाणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्ह्यातील कंधार, लातूरमधील अहमदपूर, तर परभणीतील गंगाखेड तालुक्यांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

धनुष्यबाण आणि कमळची रांगोळी…

गोपीनाथ गडावर धनुष्यबाण आणि भाजपचं कमळ यांची एकत्रितरित्या रांगोळी काढण्यात आली आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी रेखाटलेली कमळ आणि धनुष्यबाणाची रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. “आठवण साहेबांची” असे भावनिक शब्दही लिहिण्यात आले आहेत.

राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात आहेत. गंगाखेडमध्ये ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन उद्धव ठाकरे माजलगावला जाणार आहेत. परळी वैजनाथमार्गे ते माजलगावला जातील. या मार्गावर गोपीनाथ मुंडे यांचं समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथगडाला ते भेट देतील. तिथून माजलगावला रवाना होतील.

गोपीनाथगडाचं काय आहे महत्त्व?

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये पांगऱ्याच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात गोपीनाथगड उभारण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात भगवानगडाच्या उपासकांची संख्या लाखोंमध्ये आहे. गहिनीनाथगड, भगवानबाबा गड आणि नारायणगड हे बीड जिल्ह्यातील गाजणारे गड आहेत. मराठवाड्याचे सुपुत्र गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ गोपीनाथगड उभारण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments