Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसायन पोटनिवडणुकीत शिवसेना-काँग्रेसमध्येच फाईट!

सायन पोटनिवडणुकीत शिवसेना-काँग्रेसमध्येच फाईट!

Congress, Shiv Sean, BJP, MNSमहत्वाचे…
१. प्रभाग क्रमांक १७३ साठी ६ एप्रिलला मतदान
२. विद्मान नगरसेवकाच्या निधनामुळे पोटनिवडणूक
३. शिवसेना,काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक


मुंबई: महापालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक १७३ मध्ये एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली. येथे एका अपक्षासह उमेदवार रिंगणात असून खरी लढत शिवसेना विरूद्ध काँग्रेस अशीच रंगणार आहे. ही निवडणूक जिंकणे काँग्रेस व शिवसेनेसाठीही प्रतिष्ठेचे असल्यामुळे दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसचे उमेदवार सुनील बाळकृष्ण शेट्ये, शिवसेना रामदास देविदास कांबळे, अपक्ष उमेदवार गौतम यशवंत झेंडे या निवडणूक लढवत आहेत.

सायन प्रभाग १७३ मधील शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात रामदास कांबळे व संदीप कांबळे या दोन भावांचे उमेदवारी अर्ज शिवसेनेने भरले. एवढेच नाही तर, शिवसेनेच्या विरोधात दिवंगत नगरसेवक यांचे भाऊ बापू ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण शिवसेनेने बंडखोरांची समजूत काढल्यानंतर अखेर रामदास कांबळे यांच्या उमेदवारीवर एकमत झाले. त्यामुळे शिवसेनेची आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनिल शेट्ये यांच्याशी थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत गौतम झेंडे हे अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. याठिकाणी गत महानगरपालिका निवडणुकीत १५ उमेदवार रिंगणात होते. पोटनिवडणुकीसाठी मात्र तिघेजणच लढत देत आहेत.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने कंबर कसली

हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला. फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार तीन हजारांच्या फरकाने विजयी झाला तर काँग्रेस चौथ्या स्थानावर होती. त्यावेळी भाजप दुसर्‍या स्थानी होता. आता या प्रभागातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने फिल्डिंग लावली आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या अपक्ष उमेदवारास तिकीट दिले आहे. या निवडणुकीत भाजपा न उतरल्यामुळे ती शिवसेनेसाठी जमेची बाजू आहे. तरीही शिवसेनेने विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या प्रभागाची जबाबदारी विभागप्रमुखांसह ज्येष्ठ नगरसेवकांवर सोपवली आहे. ही निवडणूक काँगेसच्या नगरसेवकांचे संख्याबळ वाढवण्यासाठी तर शिवसेनेसाठी संख्याबळ जैसे थे ठेवण्यासाठी निवडणूक महत्वाची आहे.

मनसे,राष्ट्रवादी तटस्थ…

शिवकोळीवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, पावसाळी नाले, संक्रमण शिबिरातील गैरसोयी या समस्यांच्या मुद्यावर सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. भाजप, रिपाइं (ए), शिवसेनेबरोबर तर पीपल रिपब्लिकन पार्टी, रिपाइं (गवई) यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तटस्थ राहिल्याने याचा फायदा नक्की कुणाला, अशी चर्चा आतापासूनच प्रभागात सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments