Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईवचपा : मोदी सरकारने शरद पवारांची सुरक्षा हटवली

वचपा : मोदी सरकारने शरद पवारांची सुरक्षा हटवली

Sharad Pawar Securityमुंबई : महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची महत्वाची भूमिका आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणतीही माहिती न देता शरद पवारांची सुरक्षा हटवली. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महत्वाच्या व्यक्तिंना सुरक्षा पुरविण्यात येते. मात्र पवारांची सुरक्षा जाणूनबुजून काढण्यात आली असा आरोप होत आहे.

पवारांच्या दिल्ली येथील ६ जनपथ निवासस्थानाबाहेर ३ पोलीस अधिकारी, सीआरपीएफचे ३ जवान हटवण्यात आले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढली होती. त्यामुळे केंद्र सरकारवर जोरदार टीका झाली होती.

केंद्रावर टीका झाल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी ना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. सीआरपीएफच्या अति महत्वाच्या व्यक्तिंच्या व्हिआयपी सुरक्षा एसएसजीच्या प्रभारीने अतिशय जवळून समन्वय राखल्यानंतर ही नवी व्यवस्था अस्तित्वात आली. गांधी कुटुंब आणि प्रियांका वाड्रा आणि त्यांच्या मुलांना सुरक्षा पुरवतील दिल्ली बाहेरील सुरक्षा कवच देतील. असं सांगण्यात आलं. सीपीआरपीएफचे महा निरीक्षक पी. के. सिंह यांनी गांधी कुटुंबासाठीच नव्हे तर अती महत्वाच्या व्यक्तिंच्या सुरक्षेसाठी कठोर सुरक्षा नियम बनवले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments