Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज्याला मंत्रीच नाहीत, विषय मांडायचे कुणाकडे : देवेंद्र फडणवीस

राज्याला मंत्रीच नाहीत, विषय मांडायचे कुणाकडे : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Nagpur,Fadnavis,Devendra,Nagpur,BJP
Image: ANI

मुंबई: नागपूर हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार टीकास्त्र सोडले आहे. राज्याला मंत्रीच नाहीत. त्यामुळे विषय कुणाकडे मांडायचे. असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात तीन पक्षांचं सरकार सत्तेवर असून, त्यांच्यामध्ये विसंवाद आहे. भरपूर वेळ असतानाही सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले, आम्ही काळजीवाहू सरकार असताना अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात निर्णय घेतला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील मदत करून असंही म्हटलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत कमी असून, शेतमालाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रूपये, तर बागायत शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी केली होती. त्यांनीच केलेल्या मागणीची आम्ही आठवण करू देत आहोत,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

“तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं असल तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची चर्चा नाही. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, पण अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीनं सरसकट कर्जमाफी आणि कोरा सातबारा करण्याचं आश्वासनं दिलं आहे. ते कधी करणार त्याचा कार्यक्रम सरकारनं जाहीर करायला हवा. पण सरकार वेळकाढूपणा करत आहे,”अशी टीका फडणवीस यांनी केली.

महाविकास आघाडीचं हे सरकार स्थगिती सरकार आहे. ज्या कामांचे टेंडर निघाले होते. त्यालाही स्थगिती देण्यात आली. कामांना स्थगिती दिल्यानं जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारनं स्थगिती दिलेली कामे तातडीनं सुरू करावी. कर्ज असणाऱ्या मोठ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती चांगली आहे. गेल्या पाच वर्षात भरपूर निधी राज्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीचं कारण सांगून आणि चुकीच्या बातम्या पसरवून हात वर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आधी सत्ताधाऱ्यांनी बंद करावं. विरोधी पक्ष म्हणून आमच्या मागण्या नाहीत. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी केलेल्या मागण्यांचीच आम्ही आठवण करून देणार आहोत,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments