Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईछेडछाडीपासून वाचण्यासाठी मुलीची चौथ्या मजल्यावरुन उडी!

छेडछाडीपासून वाचण्यासाठी मुलीची चौथ्या मजल्यावरुन उडी!

minor girl, jumpedनालासोपारा: छेडछाडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. नालासोपाऱ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार आज उघडकीस आला. पीडित मुलीवर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नालासोपाऱ्यातील अलकापुरी परिसरात राहणारी १२ वर्षांची पीडित मुलगी फुटपाथवरून  जात असताना ३५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीने तिला पत्ता विचारला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपी पीडितेला सोबत घेऊन गेला. यानंतर आरोपीने मुलीला जबरदस्तीने सूरज अपार्टमेंटच्या गच्चीवर नेले. यावेळी मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी तरीही मुलीवर जबरदस्ती करत होता. त्याने तिच्याशी अश्लिल चाळे सुरु केले आणि तिचे कपडे काढण्याचाही प्रयत्न केला. यानंतर पीडित मुलीने स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी गच्चीवरुन उडी मारली.
गच्चीवरुन मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्याने स्थानिक रहिवासी इमारतीखाली जमले होते. मुलीने गच्चीवरुन उडी मारताच इमारतीखाली जमलेल्या लोकांनी तिला चादरीत झेलले. यामुळे मुलीचा जीव वाचला. मात्र तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. सध्या तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबद्दल तुळिंज पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडलेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments