Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस तर्फे तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस तर्फे तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०१९ रोजी उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या तिरंगा गौरव यात्रेचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे आयोजन उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष क्लाईव डायस यांनी केले असून, उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथील एच के कॉलेज येथून सकाळी १०.३० वाजता या तिरंगा यात्रेला सुरुवात होणार असून, जुहू चौपाटी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या प्रतिमेजवळ या यात्रेचे समापन होणार आहे. सर्व मुंबईकरांनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा व आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा उत्सव वाजत-गाजत साजरा करावा, असे आवाहन संजय निरुपम यांनी मुंबईतील सर्व नागरिकांना केलेले आहे.

तिरंगा गौरव यात्रेचा मार्ग:

जोगेश्वरी पश्चिम, ओशिवरा येथील एच के कॉलेज – बेहराम बाग नाका – आदर्श नगर – लोखंडवाला मार्केट – लोखंडवाला सर्कल – सरदार वल्लभभाई पटेल नगर नाका – कोकिलाबेन हॉस्पिटल – चार बंगला सिग्नल – चार बंगला मार्केट – जुहू वर्सोव लिंक रोड – कपासवाडी – जुहू सर्कल – कैफी आझमी गार्डन – जुहू रोड – ट्युलिप स्टार हॉटेल – पामग्रोव हॉटेल –जुहू चौपाटी – सांताक्रुज पोलिस बीट चौकी (महात्मा गांधी प्रतिमा )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments