Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत दोन कोरोनाग्रस्त रुग्ण व्हेंटिलेटवर!

मुंबईत दोन कोरोनाग्रस्त रुग्ण व्हेंटिलेटवर!

Ventilator Coronavirus, corona, coronvirusमुंबई : मानगुटीवर बसलेला कोरोनाचा भूत मोठ्याप्रमाणात हातपाय पसरवत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४९वर पोहोचली आहेत. दोन रुग्णांची प्रकृती चिंताग्रस्त असून दोघांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात ९५८ संशयित रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उल्हासनगरमध्ये एका ४९ वर्षीय महिलेला करोना रुग्णाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. ही महिला दुबईहून प्रवास करून आली होती. विमानतळावर तिची तपासणी करण्यात आली असता या महिलेला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे या महिलेला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय मुंबईतील एका २२ वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली आहे. ही तरुणी ब्रिटनमधून आली होती. त्यामुळे तिच्यावरही विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ४७वर पोहोचली असून देशातील करोना रुग्णांची संख्या १७१वर पोहोचली आहे.

राज्यातील रुग्ण किती आणि कुठे…

मुंबई ९, पिंपरी चिंचवड ११, पुणे ८, यवतमाळ ३, रायगड १, ठाणे १,कल्याण, नवी मुंबई ३, औरंगाबाद १, अहमदनगर १, रत्नागिरी १, उल्हासनगर १

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments