Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजप आज सत्ता स्थापनेचा दावा दाखल करणार?

भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा दाखल करणार?

Devendra Fadnavis is the favorite for the CM in the speculative marketमुंबई: भाजप आज सत्ता स्थापनादा दावा दाखल करण्याची शक्यता आहे. तसेच शेतक-यांच्या मदतीसाठी पाऊल उचलले जावे अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीकोनातून आज गुरुवारी ७ नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहेत. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थितीत राहतील.

वर्षा बंगल्यावर बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली होती. मुनगंटीवार म्हणाले होते, आम्ही इतर कोणासोबत राज्यात सरकार स्थापन करण्याचा विचारही केलेला नाही. आम्ही चुकीचे पाऊल टाकण्याचा विचार केलेला नाही. सरकार
स्थापन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत.

ओल्या दुष्काळावर चर्चेची शक्यता…

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक मदत मिळावी. केंद्राकडून मदत मिळावी यासाठी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे शेतक-यांच्या मदतीच्या दृष्टीने राज्यपालांकडे भाजपचे शिष्टमंडळ चर्चेसाठी जात असतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments