Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमनपा पोटनिवडणुकीतही भाजपचा धुव्वा, ७ पैकी ५ जागांवर पराभव

मनपा पोटनिवडणुकीतही भाजपचा धुव्वा, ७ पैकी ५ जागांवर पराभव

Congress NCP Shivsena BJP

मुंबई : राज्यातील ६ मनपाच्या ७ जागांसाठी गुरुवारी पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकींचे निकाल आज शुक्रवार ( १० जानेवारी ) रोजी जाहीर झाले. यामध्ये ६ महापालिकेतील ७ जागांपैकी ५ जागांवर भाजपचा पराभव झाला. मुंबई, नाशिक, मालेगाव आणि लातूरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. तर पनवेल आणि नागपूर पालिका पोटनिवडणुकीत भाजपला यश आलं.

पनवेलमध्ये भाजपचा विजय…

पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ ब मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने आपला गड राखला. भाजपच्या रुचिता लोंढें पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या स्वप्नल कुरघुडेंचा पराभव केला. ३८२० मताधिक्याने रुचिता लोंढे विजयी झाल्या आहेत. रुचिता लोंढे यांना ६ हजार २३१, तर स्वप्नल कुरघुडे यांना २ हजार ३८७ मतं मिळाली.

नाशिकमध्ये महाविकास आघाडी विजय…

नाशिक महापालिकेच्या प्रभाग २२ आणि २६ च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादीचे जगदीश पवार तर प्रभाग २६ मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले.  या निकालामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचं दिसून आलं.

नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

नागपूरपालिका पोटनिवडणुकीत भाजपाचं कमळ फुललं आहे. भाजपाचे उमेदवार विक्रम ग्वालबंशी प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले. काँग्रेसचे पंकज शुक्लासह सर्वच उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झालं. विक्रम ग्वालबंशी यांनी १३ हजार ३८६ हजार मतांनी विजय मिळवला.

मालेगावात एमआयएम- जनता दलचा विजय…

मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्र १२ (ड ) साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत जनता दल एमआयएम महाआघाडीचे मुस्तकीम डिग्नेटींनी एकतर्फी विजय मिळवला. त्यांच्याविरोधात असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. मुस्तकीम यांना ७९९२ मते मिळाली तर काँग्रेसच्या फारूक कुरेशींना ५१० तर अपक्ष इम्रान अन्सारींना ८१५ मते मिळाली.

२०१७ साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत जनता दल शहराध्यक्ष बुलंद इकबाल हे विजयी झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचं आकस्मित निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. जनता दलाचे मुस्तकीम यांच्या रूपाने आपली जागा राखण्यास यश मिळवले आहे. बुलंद इकबाल यांच्या निधनामुळे अपूर्ण राहिलेल्या कामांना प्राधान्याने पूर्ण करून महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे विजयी झालेले मुस्तकीम डिग्नेट यांनी सांगितले.

मुंबई मानखुर्दमध्ये शिवसेनेचा विजय…

मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरेंचा विजय झाला. भाजपच्या दिनेश ( बबलू ) पांचाळ यांचा १३८५ मतांनी पराभव केला. लोकरेंनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या लोकरेंविरोधात भाजप, काँग्रेस, समाजवादी आणि एमआयएम अशी लढत होती. मात्र, मानखुर्दमध्ये शिवसेनेने बाजी मारली. राज्यात महाविकास आघाडी असतांना सुध्दा काँग्रेसने शिवसेना विरोधात उमेदवार दिला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची सुरु होती.

प्रभाग क्रमांक १४१ मधील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे, भाजपकडून दिनेश (बबलू) पांचाळ तर काँग्रेसकडून अल्ताफ काझी रिंगणात होते. एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पक्षाचे जमीर खानसह एकूण १८ उमेदवार या निवडणुकीसाठी मैदानात उतरले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments