Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रखंडणी प्रकरण: भाजप नेते किरीट सोमय्या आता गप्प का?;राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

खंडणी प्रकरण: भाजप नेते किरीट सोमय्या आता गप्प का?;राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

मुंबईः भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र व नगरसेवक नील सोमय्या हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. नील सोमय्यांची खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने राज्यातील महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येत होते. शिवसेना नेत्यांवर किरीट सोमय्या सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी किरीट सोमय्यांना या प्रकरणी घेरलं असून आता सोमय्या गप्प का?, असा सवाल केला आहे.

किरीट सोमय्या यांच्या मुलाची खंडणीप्रकरणी चार तास कसून पोलिस चौकशी झाली आहे. यावर आता किरीट सोमय्या गप्प का?, असा त्यांनी केला आहे. तसंच, ज्याला कर नाही त्याला डर कशाची, असा प्रश्नही आमच्या मनात येतो. यासंबंधी किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मुलाच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तपासे यांनी केली आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?

भाजप नगरसेवक नील सोमय्या यांचे नाव एका खंडणीच्या प्रकरणात आले होते. हे जुने प्रकरण असून याप्रकरणी नील यांची नव्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात नील यांचा जबाब नोंदवण्यात आला. नील यांच्यावर बिल्डरकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments