Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश राणे उद्धव ठाकरेंना म्हणाले, ‘चार हाडांचा बीएमसी चोर’!

निलेश राणे उद्धव ठाकरेंना म्हणाले, ‘चार हाडांचा बीएमसी चोर’!

Nilesh Rane,Tweets,Tweeted, Twitter,Rane,Uddhav Thackerayकणकवली मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राणे कुटुंबियांवर सडकून टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून माजी खासदार निलेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर प्रहार केला. ‘चार हाडांचा बीएमसी चोर’ असं टि्वट करुन डिवचलं. यामुळे शिवसेना विरुध्द राणे असा सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे बुधवारी कोकण दौऱ्यावर होते. बुधवारी त्यांची कणकवली येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर सडकून टीका केली. या टीकेनंतर नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टीका केली आहे. ‘चार हाडांचा बीएमसी चोर आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत भाजप उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारासाठी गेले होते. त्यानंतर बुधवारी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कणकवलीत गेले होते. शिवसेनेने राणे यांचे पूर्वीचे निकटवर्तीय सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. राज्यभरात भाजप-शिवसेना महायुती असूनही या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर लढणार आहेत. हा सामना राणे विरूध्द ठाकरे असा रंगला असून शिवसैनिकांनी राणेंच्या चिरंजीवांना पाडण्याचा विडा उचलला आहे. यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments