Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रनितेश राणे आमदारकीचा राजीनामा देणार

नितेश राणे आमदारकीचा राजीनामा देणार

अमरावती – काँग्रेस पक्ष मला पक्षातून काढण्याचे मुहूर्त शोधत आहे. मात्र त्याआधीच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत सांगितले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्यापूर्वी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. व एनडीएला पाठिंबा दर्शविला. परंतु भाजपाच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपदासाठी सध्या वाट बघावी लागत असल्यामुळे ते सध्या विविध भागात दौरे करत आहेत. पुत्र नितेश राणे हे काँग्रेसचे आमदार असून तेही काँग्रेसमधून बाहेर पडण्याची वाट बघत आहेत. अमरावती येथे नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा खरा चित्रपट हा १८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. यावेळी देवा चित्रपटाबाबत बोलताना, देवा चित्रपटाला मल्टिफेलक्स आणि वेळ न दिल्यास त्यांनी आपल्या चित्रपट गृहाचा इन्शुरन्स काढून ठेवावा, असेही ते यावेळी म्हणाले. येत्या १८ फेब्रुवारीला अमरावती येथे नारायण राणे यांची जाहीर सभा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments