Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरधनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावर जयंत पाटील म्हणाले...

धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावर जयंत पाटील म्हणाले…

अहमदनगर : धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावरून राज्यात विरोधकांनी मुंडे आणि ठाकरे सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे.

अहमदनगर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. “राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही.

धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. कुटुंबातील अंतर्गत बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

मुंडे-शर्मा प्रकरणावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचाही हवाला दिला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणं योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments