Friday, April 26, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरछत्रपतींचा अपमान करणारा श्रीपाद छिंदम पोलीस संरक्षणात करतोय प्रचार

छत्रपतींचा अपमान करणारा श्रीपाद छिंदम पोलीस संरक्षणात करतोय प्रचार

 Shripad Chindam
अहमदनगर : अहमदनगर शहर मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचा उमेदवार श्रीपाद छिंदम पोलीस संरक्षणात प्रचार करत आहेत. छिंदम अहमदनगर महापालिकेत भाजपाचा उपमहापौर असताना त्याने शिवरायांचा अपमान केला होता त्यामुळे त्याची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली होती.

छिंदम हा त्यानंतर महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडून आला. आता तो बसपातर्फे विधानसभेची निवडणूक लढवत आहे. छिंदमने त्याचे प्रतिस्पर्धी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून, त्यांच्या समर्थकांकडून आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केल्यानंतर त्याला सशस्त्र अंगरक्षक देण्यात आला आहे. त्यामुळे छिंदम याचा पोलीस संरक्षणात प्रचार सुरु आहे.

दरम्यान छिंदम यांच्या प्रचारासाठी शनिवारी पक्षाच्या अध्यक्षा, माजी मुख्यमंत्री मायावती यांची शहरात प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. मायावती यांची यापूर्वी सन २००४ मध्ये नगरमध्ये सभा झाली होती. आता बसपाने सभेची जोमाने तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

छिंदमच्या घराची,गाडीची झाली होती तोडफोड…

शिवरायांचा अपमान केल्यानंतर श्रीपाद छिंदमला अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे आमदार व संग्राम जगताप यांच्या सांगण्यावरुन १६ फेब्रुवारी २०१८ च्या घटनेचा आधार घेत त्यांच्या समर्थकांनी आपल्या घराची, गाडीची तोडेफोड केली होती र तक्रार केली होती. याच घटनेचा आधार घेत संरक्षणाची मागणी केली होती. जगताप यांनी आपल्याला पकडून देण्यासाठी जाहीर केलेले अकरा लाखांचे बक्षीस, उमेदवारी दाखल केल्यानंतर आपल्याला येत असलेल्या धमक्या यामुळे आपण पोलिसांकडे अंगरक्षकाची मागणी केली होती. अशी माहिती छिंदम याने माध्यमांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments