Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनंदुरबारखासदार सुप्रिया सुळे पाठोपाठ डॉ. हिना गावितांनाही डेंग्युची लागण

खासदार सुप्रिया सुळे पाठोपाठ डॉ. हिना गावितांनाही डेंग्युची लागण

Hina Gavit suffers from dengue
नवापूर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डेंगूची लागण झाली होती. ही घटना ताजी असताना आता भाजपाच्या खासदार डॉ. हिना गावित यांनाही डेंग्यु सदृश्य आजाराची लागण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील डेंग्यु सदृश्य आजाराने थैमान घातले आहे.

जिल्ह्यासह नवापूर शहरात आतापर्यंत शेकडो नागरिकांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात शहरातील फरहाण मकराणी वय 12 वर्षे, अब्दुल खालीक महंमद माकडा वय 17 वर्षे यांना डेंग्युची लागण झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डेंग्युचे वाढते प्रमाण पाहता शहरातील नागरिकांचा आक्रोश वाढला आहे.

गेल्या महिन्यापासून डेंग्युसदृश रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. एकूण रुग्णांची संख्या 50 वर गेली आहे. अनेक रूग्ण गुजरात राज्यातील सोनगड, व्यारा, बारडोली, सुरत येथे खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. त्यातील 30 रुग्ण महापालिका हद्दीतील तर 20 रुग्ण शहराबाहेरील आहेत. या सर्व घटनांमुळे प्रशासन हादरून गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments