रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या मातोश्रींचे निधन

- Advertisement -

महत्वाचे…
१.दुपारी ३ वाजता वांद्रे येथील खेरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
२. वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात उपचार सुरु होते
३. पार्थिव अंत्यदर्शनासाठी संविधान बंगल्यावर ठेवण्यात आले


मुंबई – केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले यांचे निधन झाले आहे. हौसाबाई आठवले यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी ( १६ नोव्हेंबर ) सकाळी वाजण्याच्या सुमारास मुंबईत निधन झाले. हौसाबाई ८८ वर्षांच्या होत्या. वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हौसाबाई आठवले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ‘संविधान’ बंगल्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.  दुपारी ३ वाजता वांद्रे येथील खेरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -