ऊसाला एफआरपीसह २०० रुपयांचा भाव

- Advertisement -

ऊस दराच्या आंदोलनात यशस्वी तोडगा निघालाय. एफआरपीसह दोनशे रुपयांचा भाव जाहीर केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा भाव मान्य केला असून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यापुरतं आंदोलन मागं घेण्याची घोषणा केलीये.

एफआरपीसह दोनशे रुपयांचा भाव दोन टप्प्यात मिळणार आहे. दुसरीकडं रयत क्रांती संघटनेनंही ऊसदर जाहीर झाल्यानंतर साखर वाटून आनंद साजरा केलाय.

कोल्हापूरच्या निर्णयाप्रमाणेच सांगली, पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातील कारखानदारांनीही अशा पद्धतीने निर्णय घ्यावा असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

- Advertisement -

मात्र रघुनाथदादा पाटील यांना हा निर्णय मान्य नाहीय. दरम्यान साखर कारखानदारांनी एफआरपी आणि 200 रुपयांची रक्कम ही दोन टप्प्यांमध्ये देण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे जवाहर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने आजची बैठक झालीय. तसंच कोल्हापूरच्या निर्णयाप्रमाणेच सांगली, पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातील कारखानदारांनीही अशा पद्धतीने निर्णय घ्यावा असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

- Advertisement -