Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणमहाड एमआयडीसीत भीषण आग, स्फोटाने परिसर हादरला!

महाड एमआयडीसीत भीषण आग, स्फोटाने परिसर हादरला!

Fireरायगड: रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परिसर गुरुवारी दुपारी स्फोटाच्या आवाजाने हादरला. एमआयडीसीतील प्रिव्ही ऑर्गेनिक कंपनीत दुपारी भीषण आग लागली. कंपनीतून स्फोटाचा आवाज आला असून हा स्फोट नेमका कसला होता आणि आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

महाड एमआयडीसीत प्रिव्ही ऑर्गेनिक ही कंपनी असून या कंपनीत दुपारी आग लागली. आगीसोबत कंपनीतून स्फोटांचे आवाजही आले आणि संपूर्ण परिसर या आवाजांनी हादरुन गेला. परिसरात सर्वत्र धुराचे लोट असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments