राज ठाकरेंची नगरसेवकांशी आता थेटभेट

- Advertisement -

मुंबई : मुंबईतील सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आणखी नुकसान होऊ नये यासाठी थेट कामाला सुरुवात केली आहे. नगरसेवकांशी थेटभेट घेणार आहेत. मुंबईतील सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील राजकीय घडामोडीनंतर राज ठाकरे आता राज्यातील इतर ठिकाणच्या नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवलीमधील नगरसेवकांशी तिथं जाऊन संवाद साधणार आहेत.

कल्याणमध्ये मनसेचे नऊ, नाशिकमध्ये पाच तर पुण्यात दोन नगरसेवक आहेत. शिवसेनेच्या मास्टरस्ट्रोकनंतर इतर ठिकाणीही असे प्रकार घडता कामा नये यासाठी आता राज ठाकरे स्वत: नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्या काही समस्या आहेत का ते जाणून घेणार आहेत. याचसोबत त्या शहरांमधील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्याशीही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान दुसरीकडे मनसेच्या 6 नगरसेवकांना वेगळा गट काढण्याची परवानगी देऊ नये म्हणून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण आयुक्तांच्या कार्यालयात निवेदन दिलं आहे.

- Advertisement -