Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रराणे कुटुंबियांना भाजप प्रवेशाचा मुहूर्त लागेना

राणे कुटुंबियांना भाजप प्रवेशाचा मुहूर्त लागेना

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांना भाजप प्रवेशाला भाजपकडून तारीख पे तारीख मिळत आहे. राणे यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली. परंतु प्रवेशाबाबत अद्यापही मुहूर्त लागला नाही. त्यामुळे राणेंची अडचण झाली आहे.

राणेंचे शिवसेनतील विरोधक एकवटल्याने भाजपची अडचण झाली आहे. राणे कुटुंबिय 2 ऑक्टोबरला प्रवेश करणार अशीही चर्चा होत आहे. मात्र, अधिकृतपणे  याला दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे राणेंच्या प्रवेशाचे काय यामुळे त्यांचे कार्यकर्तेही संभ्रावस्थेत आहेत.
गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंशी बोलल्याशिवाय असा कोणताही निर्णय होणार नाही, अशी माहिती माध्यमांना दिली. केसरकर म्हणाले, “गांधी जयंतीच्या दिवशी नारायण राणेंसारख्या व्यक्तीला भाजप प्रवेश देईल असं वाटत नाही. या व्यतिरिक्त नारायण राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंशी बोलूनच निर्णय घेणार आहेत. अजून तरी त्यांचं उद्धव ठाकरेंशी काहीही बोलणं झालेलं नाही.
नारायण राणेंचा भाजप प्रवेश 2 ऑक्टोबरला निश्चित झाला आहे. हा भाजप प्रवेश मुंबईतच दुपारी 4 वाजता होईल, अशीही चर्चा जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे नारायण राणेंसोबत त्यांचे दोन्ही मुल नितेश राणे आणि निलेश राणे हेही भाजप प्रवेश करतील. आमदार नितेश राणे 1 ऑक्टोबरला मंगळवारी मुंबईत आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचीही चर्चा सुरु आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments