संभाजी भिडेंना मातोश्रीवर प्रवेश नाकारल्यानंतर भिडे वर्षा बंगल्यावर!

- Advertisement -

Sambhaji Bhide was denied entry in Matoshree sanjay raut
मुंबई : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना मातोश्रीवर भेट नाकारल्यानंतर भिडे हे थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, मध्यस्थीसाठी कोणीही येण्याची गरज नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळेच भिडेंना मातोश्रीवर प्रवेश नाकारण्यात आल्याची चर्चा आहे.

शिवसेना भाजपातील पेच कायम असल्यामुळे मार्ग काढण्यासाठी भिडे हे गुरुवारी मातोश्रीवर गेले होते. परंतु भिडे यांना प्रवेश नाकारल्यानंतर त्यांना तेथून परत जावे लागले. भिडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे भिडे मार्ग काढण्यासाठी मातोश्रीवर आले असतील अशी चर्चा होती.

भिडे आज मुख्यंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काय चर्चा करतात. काही मार्ग काढू शकतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे सत्तेचा पेच सोळाव्या दिवशीही कायम आहे.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here