Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeविदर्भनागपूरसंघाच्या बौद्धिक वर्गाला खडसे, देशमुखची दांडी!

संघाच्या बौद्धिक वर्गाला खडसे, देशमुखची दांडी!

Eknath Khadse, Ashish Deshmukh, BJP, Khadse, Sangh, RSS

महत्वाचे…

१. अनुपस्थित सदस्यांना नोटीसा
२. खडसे, देशमुख पक्षावर नाराज असल्याची चर्चा
३. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणूकापूर्वी गळती होणार

नागपूर: गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेतून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपूरच्या हेडगेवार स्मृतीमंदिरात बुधवारी अधिवेशनापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री या ठिकाणी आले होते. मात्र, एकनाथ खडसे आणि विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांनी बौद्धिक वर्गाला दांडी मारली.

या दोघांसह आणखी काही आमदार या बौद्धिकाला गैरहजर असल्याचे समजते. या सर्वांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्यावतीने देण्यात आली. नागपूर अधिवेशनात दरवर्षी भाजपच्या आमदारांसाठी संघ मुख्यालयात बौद्धिकाचं आयोजन केलं जातं. आजही या आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी खडसे आणि देशमुख यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एकनाथ खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये सामावून घेतेल जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंचे पुनवर्सन करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाला बगल दिली. त्यांनी म्हटले की, पुनवर्सन हे विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नाही. एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याविषयी सकारात्मक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

तर दुसरीकडे आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ७ पानांचे पत्र लिहले होते. या पत्रामध्ये त्यांनी राज्यातील भाजप सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. या पत्रामध्ये त्यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. विदर्भ स्वतंत्र झाला नाही तर राजीनामा देईन, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी आजच्या बौद्धिक वर्गाला दांडी मारल्याची चर्चा आहे. दरम्यान, आजच्या बौद्धिकाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे देखील उपस्थित नव्हते. तब्येतीचं आणि निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण देऊन बहुतेक आमदारांनी बौद्धिकाला दांडी मारली असली तरी त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावून जाब विचारण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments