Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ समाजवादी नेत्या माजी आमदार कमल देसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या माजी आमदार कमल देसाई यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि माजी आमदार कमल देसाई यांचे मंगळवारी गोरेगाव येथे निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. गोरेगाव, ओशिवरा येथे आज दुपारी विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मृणाल गोरे यांच्या साथीने त्यांनी सत्तर आणि त्यानंतरच्या दशकात महागाई प्रतिकार महिला आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या नाकात दम आणला होता. याची दखल घेत जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करण्यास सरकारला भाग पाडले होते. छबूताई या टोपण नावाने त्या ओळखल्या जात. मृणालताईंच्या जोडीने त्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरत तेव्हा, रणरागिणींच्या या जोडीला मोठ्या पोलीस बळालाही आवरता येत नसे.
मृणालताई आणि कमल देसाई या लाटणे आणि हंडेवाल्या बाई म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचे लाटणे आणि हंडे मोर्चे प्रचंड गाजले होते. त्यांच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने कष्टकरी आणि मध्यमवर्गीय महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी होत. या मोर्चांनी मुंबई बऱ्याचदा ठप्प झाली होती. प्रसंगी मंत्रालयात घुसून त्यांनी मंत्र्यांना भाववाढ कमी करण्यास भाग पाडले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments