Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeकोंकणठाणेएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी ?

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी ?

ठाणे : ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर झाला असून, त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शर्मा यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शर्मा यांना शिवसेनेतर्फे नालासोपारा किंवा मुंबईतील एखाद्या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शर्मा हे राजकीय आखाड्यात आपले भाग्य आजमावणार असल्याची चर्चा काही महिण्यांपासून सुरू होती. अखेर गृह विभागाचे उपसचिव व्यंकटेश भट यांनी शर्मा यांचा राजीनामा मंजूर केला. परंतु राज्य पोलिस महासंचालकांना पत्र लिहून, शर्मा यांचे सेवानिवृत्तीचे लाभ न्याप्रविष्ट प्रकरणाच्या अंतिम निकालापर्यंत रोखा, असे त्यांनी कळवले आहे. राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैयाप्रकरणी महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या २००९च्या आदेशास आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात दाखल आहे. त्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत शर्मा यांना निवृत्तीवेतनाचे लाभ मिळणे कठीण आहे.

शर्मा यांनी ४ जुलै रोजी गृह विभागाकडे राजीनामा पाठवला होता. वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु दोन महिन्यांपासून त्यांचा राजीनामा गृहविभागाकडून स्विकारण्यात आला नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments