शिवसेना आमदार खरेदी प्रकरण: महसूल मंत्री पाटील यांची सीबीआय मार्फत चौकशी करा…राऊत

- Advertisement -

मुंबई – शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यासाठी पैसा नाही. शिवसेनेचे आमदार खरेदीसाठी भाजपाकडे पैसा आहे. भाजपाकडे सर्व काळा पैसा आहे. या सर्व प्रकरणाची सीबीआय किंवा ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली असून शिवसेना फोडाफीच्या राजकारणामुळे चांगलीच आक्रमक झाली आहे.

भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी ५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी केला होता. २५ आमदारांना भाजपा प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. मागील महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती,’ असा गौप्यस्फोट हर्षवर्धन यांनी केला आहे.

हर्षवर्धन जाधव हे औंरगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत. ‘पक्षात आल्यास निवडणुकीचा खर्च भाजपाकडून करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते,’, असंदेखील हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. शिवसेना आमदार जाधव हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावाई आहेत. जाधव आणि शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरु होता. मात्र मातोश्रीवरुन दोघांमध्ये काही दिवसांपूर्वीच मनोमिलन घडवून आल्यामुळे हा वाद संपला असल्याचेही जाधव यांनी जाहीर केलेले आहे. भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे पुन्हा शिवसेना भाजपामध्ये वाद निर्माण झाला आहे. या विषयी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -