एस.टी.चे कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार?

- Advertisement -

महत्वाचे…
१.पगारवाढीसंदर्भात अंतरिम अहवाल राज्य सरकारने न्यायालयात दाखल करण्यास विलंब २. एस.टी.चे कर्मचारी पुन्हा बेमुदत संप पुकारला तर प्रवाशांचे होणार हाल ३. महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसची (इंटक) ची बैठक


मुंबई : राज्यातील एस.टी.कर्मचार्‍यांच्या पगारवाढीसंदर्भात अंतरिम अहवाल राज्य सरकारने न्यायालयात दाखल न केल्याने एस.टी.चे कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसची (इंटक) औरंगाबाद इथे बैठक होणार आहे.

- Advertisement -

एस.टी. कर्मचार्‍यांनी ऐन दिवाळीत १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून चक्काजाम आंदोलन केले होते. मुंबई उच्च न्यायालयाने संपात हस्तक्षेप करीत १५ नोव्हेंबरपर्यंत सरकारने अंतरिम वाढीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुदत उलटून गेली तरी राज्य सरकारने अहवाल सादर केला नाही.

- Advertisement -