Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेभिमा कोरेगाव येथे वाहनांवर दगडफेक

भिमा कोरेगाव येथे वाहनांवर दगडफेक

पुणे – नगर रस्त्यावर सणसवाडी येथे अज्ञातांकडून गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली होती. भीमा कोरेगाव येथे मोठ्या संख्येने नागरिक हजेरी लावत आहेत.

जवळपास ४० गाड्यांवर दगडफेक झाल्याचे समजते. मात्र, दगडफेक का करण्यात आली, कोणी केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाही. पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळविल्याने तणावपूर्ण परिस्थिती निवळली आहे. मात्र दगडफेक करणारे ते तरुण कोण होते याचा तपास शोध पोलिस घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments