Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार ,अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवारसह ७० जणांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आलं होतं. त्यामध्ये अनियमितता आढळली होती. या सगळ्याची चौकशी आता ईडीतर्फे केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

महाराष्ट्र राज्य सहाकरी बँकेने मनमानीने कर्ज वाटप केलं होतं. त्यामुळे या बँकेला १० हजार कोटींचं नुकसान झालं होतं. हा घोटाळा २५ हजार कोटींवर गेला. या प्रकरणी अण्णा हजारे यांनी तीन वर्षांपूर्वीच याचिका दाखल केली होती. याप्रकरणी चौकशी समितीही नेमण्यात आली आहे. विजयसिंह मोहिते पाटील, शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेकापचे जयंत पाटील यांचंही नाव यामध्ये समोर आलं आहे. मात्र आमची यामध्ये काहीही चूक नाही असं शेकापचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. बँकेशी संबंधित सर्व संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून राज्य सहकारी बँकेचा उपयोग झाला. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले होते. आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments