रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?;नाना पटोलेंचा सवाल

- Advertisement -
state-president-mla-nana-patole-ramdev-baba-anil-ambani-mihan-land-subhash-desai
state-president-mla-nana-patole-ramdev-baba-anil-ambani-mihan-land-subhash-desai

मुंबई: रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कसाठी  तसेच अनिल अंबानीच्या उद्योगासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये राज्य सरकारने नाममात्र दराने जमीन दिली होती. परंतु त्या जागेवर अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत? त्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार ? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.

रामदेवबाबांचा पतंजली समूहास मिहान प्रकल्पामधील २३० एकर जमीन

“मिहान प्रकल्पामधील २३० एकर जमिनीवर रामदेवबाबांचा पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होता. रामदेवबाबांना ही जमीन ६६ वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली होती. या उद्योगामुळे ५० हजार रोजगार निर्मिती होईल तसेच दररोज ५ हजार कोटींचा कच्चा माल खरेदी केला जाईल असा दावा करण्यात आला होता. परंतु चार वर्षे झाली तरी अद्याप या जागेवर पतंजलीचा उद्योग उभा राहिलेला नाही.

- Advertisement -
हेही वाचा: अखेर सचिन वाझे यांची बदली; गृहमंत्र्यांची घोषणा

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीसाठी मिहानमध्ये २८९ एकर जमीन

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये २८९ एकर जमीन देण्यात आली आहे. या उद्योगातूनही प्रत्यक्ष २००० तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगार निर्मिती होईल असा दावा करण्यात आला होता पण हा प्रकल्पही अद्याप उभा राहिलेला नाही,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; ‘ती’ गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती 

नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, “रामदेवबाबा, अनिल अंबानींसह ज्यांना ज्यांना उद्योग निर्मितीसाठी सरकारने जमिनी उपलब्ध करुन दिल्या, पण त्या जागेवर उद्योग उभे राहिले नाहीत त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करु”.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here