Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेइंजिनिअर तरुणीची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

इंजिनिअर तरुणीची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

पुणे – आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. अश्विनी गवारे (वय-२२ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मुंढवा येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत ती कामाला होती.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अश्विनी गवारे गेल्या काही दिवसांपासून रजेवर होती. आज सकाळी ती पुन्हा कामावर हजर झाली. दरम्यान, काही वेळानंतर अश्विनी कंपनीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि तेथून खाली उडी मारुन तिने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. घरगुती कारणातून तिने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मुंढवा पोलीस याप्रकरणाचा आधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments