Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रTDS घोटाळा: ४४७ कंपन्यांनी कर्मचा-यांचे ३२०० कोटी लाटले

TDS घोटाळा: ४४७ कंपन्यांनी कर्मचा-यांचे ३२०० कोटी लाटले

TDS scam,income tax,mumbaiमहत्वाचे…
१. आयकर विभागाने अशा ४४७ कंपन्यांची माहिती मिळवली
२. आपल्या कर्मचा-यांचा टीडीएस कापून घेतला, मात्र तो सरकारकडे जमाच केला नाही
३. अनेक प्रकरणांमध्ये वॉरंट जारी


मुंबई:  आयकर विभागने ३२०० कोटींचा टीडीएस घोटाळा उघड केला. आयकर विभागाला ४४७ कंपन्यांची माहिती प्राप्त झाली. ज्यांनी आपल्या कर्मचा-यांचा टीडीएस कापून घेतला, मात्र तो सरकारकडे जमाच केला नाही. या कंपन्यांनी कर्मचा-यांच्या टीडीएसचा वापर आपल्या व्यवसायात गुंतवणुकीसाठी वापरला. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली.

या विषयी अधिक माहिती की, आयकर विभागाच्या टीडीएस विभागाने कंपन्यांविरोधात चौकशी सुरु केली असून, अनेक प्रकरणांमध्ये वॉरंट जारी करण्यात आला आहे. प्राप्तिकर कायद्यांतर्गत या प्रकरणात तीन महिन्यांच्या कारावासापासून ते दंडासहित सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. आरोपी कंपन्या आणि मालकांविरोधात आयटी अॅक्टच्या सेक्शन २७६ बी अंतर्गत कारवाई केली जात आहे. मात्र या कंपन्या कोणत्या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तसेच हा प्रकार किती वर्षापासून सुरु होता. तसेच आयकर विभागाला याची माहिती आताच कशी मिळाली असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments