Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशबोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्यूबद्दलचा योगायोग!

बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्यूबद्दलचा योगायोग!

मुंबई: अर्जून कपूरचा इश्कजादेहा पहिला सिनेमा २०१२ साली मे महिन्यात प्रदर्शित झाला. मात्र त्याआआधीच म्हणजे २५ मार्च २०१२ रोजी मोना यांचे निधन झाले. श्रीदेवी यांच्याबद्दलही असेच काहीसे घडले. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीचा धडकहा पहिलावहिला सिनेमा जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच श्रीदेवी यांचे निधन अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींचा मृत्यू दुर्देवी योगायोग आहे.

लोकप्रिय सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी दुबईत हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोहित मारवाह आणि अंतरा मोतीवाला यांच्या लग्नसमारंभासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूरबरोबर दुबईला गेल्या होत्या. बोनी आणि श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी ही ‘धडक’ या तिच्या पहिल्या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने कुटुंबियांसोबत दुबईला जाऊ शकली नव्हती.

अर्जून कपूरचा ‘इश्कजादे’ हा पहिला सिनेमा २०१२ साली मे महिन्यात प्रदर्शित झाला. मात्र त्याआआधीच म्हणजे २५ मार्च २०१२ रोजी मोना यांचे निधन झाले. श्रीदेवी यांच्याबद्दलही असेच काहीसे घडले. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीचा ‘धडक’ हा पहिलावहिला सिनेमा जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच श्रीदेवी यांचे निधन अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांनी ट्विटवरही आपल्या मुलीच्या सिनेमाचा पोस्टर ‘पीन’ ट्विट करुन ठेवला आहे. यावरूनच त्या आपल्या मुलीच्या पहिल्या सिनेमाची किती आतुरतेने वाट पाहत होत्या हे सहज स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments