Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकासआघाडी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार

महाविकासआघाडी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार

The  Maha Vikas Aghadi will claim to establish power todayमुंबई: देवेंद्र फडणवीस सरकार 78 तासानंतर कोसळलं. त्यानंतर आज मंगळवारी महाविकासआघाडीच्या वतीने सर्व आमदारांची, नेत्यांची बैठक हॉटेल ट्रायडंन्टमध्ये होणार आहे. बैठकीनंतर महाआघाडीच्या वतीने राज्यपालांकडे सत्तास्थापन्याचा दावा दाखल करणार आहे.

महाविकास आघाडीचे सर्व आमदार, नेत्यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहेत. हॉटेलमध्ये सर्व आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी, प्रा.जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारीही तिन्ही पक्षांच्या नेत्यांना शपथ देण्यात आली होती. आज पुन्हा तिन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक होणार आहे. यासाठी सर्व आमदारांमध्ये चैतन्य पसरलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments